पुणे, १५ फेब्रुवारी २०२५:- पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण हे वाढत आहे.शहरात या आजाराचे आजपर्यंत २०० हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहे.तर ८ रुग्णांचा मृत्यू झालं आहे. पुण्यातील नांदेड गाव येथे या आजाराचे रुग्ण वाढत असून त्या परिसरात असलेल्या विहिरीमुळे हे रुग्ण वाढत असल्याच सांगितल जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.ते म्हणाले की खडकवासला परिसरात मध्यंतरी जे काही याबाबत रुग्ण वाढले तर आपल्याला वाटलं की पाण्यामुळे हे रुग्ण वाढले आहे.परंतु या भागात काहींचं म्हणणं आहे की कोंबड्यांच मास खाल्ल्याने हा आजार झाला आहे.याबाबत माहिती देखील घेण्यात आली आहे. त्या परिसरातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नसून फक्त ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतल पाहिजे ते मास कच्च राहील नको त्यामुळे हे होत आहे.तसेच सध्या जीबीएस बाबत परिस्थिती आटोक्यात आली आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये अस यावेळी अजित पवार म्हणाले.
पुणे महापालिकेच्या ७५ व्यां वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महापालिकेत भेट दिली.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की हे धाधंत खोटं आहे.याबाबत ना फडणवीस यांनी सांगितलं ना एकनाथ शिंदे यांनी सांगितल आहे.तुम्हाला बातम्या नाही मिळाल्या की कोल्डवॉर, हॉटवॉर सुरू असल्याचं सांगतात.पण आमच्यात असं काहीही नाही.सगळं चांगल चाललं आहे.आम्ही राज्याच्या भल्यासाठी पाऊले उचलत आहोत आणि राज्याला पुढे नेणार अर्थसंकल्प आम्ही मांडू अस यावेळी अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक मध्ये मला हलक्यात घेऊ नका अस म्हटल आहे.याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की त्यांचं उबाठा चे प्रमुख यांना तो इशारा आहे.अस यावेळी अजित पवार म्हणाले.
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली असून यावर जोरदार राजकारण सुरू झालं आहे.याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मुंडे हे मंत्री आहे तर धस हे आमदार आहे.यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला सुसंस्कृत पणा शिकवल आहे.त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध असून या भेटी ला वेगळं अर्थ काढू नका अस यावेळी अजित पवार म्हणाले.
संतोष देशमुख कुटुंबियांच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की कुठल्याही कुटुंबावर असल्याप्रकारचा आघात कोसळल्यावर प्रत्येकाला भावना येत असते.त्यांचं म्हणणं रास्त आहे.आमचं प्रयत्न आहे की ज्या यंत्रणेला तपास दिलं आहे त्यांच्याकडून रिपोर्ट यावे तसेच जे कोणी यात दोषी असेल तर त्याची गैर केली जाणार नाही.ज्यांच्या पर्यंत याचे धागे धोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.अस यावेळी अजित पवार म्हणाले.ते पुढे म्हणाले की या प्रकरणातील एक व्यक्ती अजूनही सापडत नाहीये.आम्हाला देखील वाईट वाटत आहे की ६० दिवस झाले अजूनही आरोपी पकडल गेलेलं नाही.अस देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बाबत पवार यांना विचारल असता ते म्हणाले की मी मागे देखील सांगितल आहे की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.सरकार कडून कोणालाही पाठीशी घातलं जातं नाहीये.अस यावेळी अजित पवार म्हणाले.
More Stories
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विंग्स फॉर ड्रीम्स’तर्फे पुण्यात निषेध
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण
पथ विक्रेता कायदा अंमलबजावणी परिषदेस चांगला प्रतिसाद