July 22, 2024

पुणे: मद्यपान केल्यानंतर सहकार्‍याला बेदम मारहाण, टोळक्याविरुद्ध गुन्हा

पुणे, दि. २०/०७/२०२३: मद्यपान केल्यानंतर टोळक्याने एका सहकार्‍याला बेदम मारहाण करुन त्याच्या डोक्यात रॉडने मारून गंभीररित्या जखमी केले. ही घटना १५ जुलैला रात्री अकराच्या सुमारास महंमदवाडीतील कृष्णानगरमध्ये घडली.

मुकूल भंडारी, रियाज शेख, आण्णा यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर शेलार (वय ३४, रा. वानवडी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर आणि आरोपी एकमेकांचे मित्र असून १५ जुलैला रात्री अकराच्या सुमारास एकत्रित मद्यपान करीत होते. त्यानंतर आरोपी मुकूलने श्रीधरला शिवीगाळ करीत मारहाण केली. इतर आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करीत डोक्यात रॉडने मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.