पुणे, २०/०८/२०२३: मैत्रीच्या जाळ्यात ओढून हाॅटेल व्यावसायिकाकडून एक लाख ८० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाॅटेल व्यावसायिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला हाॅटेल व्यावसायिकाच्या मित्राची पत्नी आहे.
आर्थिक व्यवहारांमुळे दोघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण झाले. त्यानंतर महिलेने हाॅटेल व्यावसायिकाच्या प्रेमपाशात ओढण्याचा प्रयत्न केला. हाॅटेल व्यावसायिकाने तिला प्रतिसाद दिला नाही. महिलेने त्याला शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकावले. मात्र, त्याने नकार दिला. त्यानंतर हाॅटेल व्यावसायिकाकडे तिने दोन लाख रुपयांची मागणी केली.
बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करुन नातेवाईकात बदनामी करण्याची धमकी तिने हाॅटेल व्यावसायिकाला दिली. घाबरलेल्या हाॅटेल व्यावसायिकाने तिला एक लाख २० हजार रुपये दिले. त्यानंतर हे प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून तिने त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. हाॅटेल व्यावसायिकाने तिला ६० हजार रुपये दिले. हाॅटेल व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना तिने धमकावून शिवीगाळ केल्याचे हाॅटेल व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपी महिला हाॅटेल व्यावसायिकाला धमकावत होती. तिच्या धमकीमुळे घाबरलेल्या हाॅटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करत आहेत.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ