October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: बनावट प्रमाणपत्र सादर करुन पोलीस दलात नोकरी – पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा

पुणे, १२/०८/२०२३: भूकंपग्रस्त असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून पोलीस दलात नोकरी मिळवल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस शिपाई गोविंद मधुकर इंगळे असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. इंगळे शिवाजीनगर मुख्यालयात नियुक्तीस आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपतराव अब्दागिरे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये पुणे पोलीस दलात झालेल्या भरती प्रक्रियेत इंगळे सहभागी झाला होता. त्याने भूकंपग्रस्त कोट्यातून अर्ज केला होता. भूकंपग्रस्त असल्याची कागदपत्रे त्याने सादर केली होती. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले. शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.