पुणे, १३/०५/२०२५: दहावीच्या परीक्षेत ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल,अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल,एम.सी.ई.एस. इंग्लीश मिडीयम स्कुल या शाळांनी घवघवीत यश मिळवले आहे.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार,उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख,शाळा समिती अध्यक्ष हाजी कदीर कुरेशी,एस.ए.इनामदार,मुख्याध्यापक राज मुजावर,प्राचार्या सौ.रोशन आरा शेख,मुख्याध्यापिका असफिया अन्सारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’चा उर्दू माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. खान मो. कोनेन जावेद हा ८५. २० टक्के गुण मिळवून प्रथम, तर सुफियान अहमद शेख ने ८३. २० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. पटेल मोहम्मद तौहीद अलताफ याला ८०. ८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळाला. अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’चा इंग्रजी माध्यमाचा निकाल ९९. ०२ टक्के लागला आहे.‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’मध्ये इंग्रजी माध्यमाची शाह गुलाबशाह शमसेआलम ही ९४. ४० टक्के मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम आली. द्वितीय क्रमांकाची सिद्दीकी अरबाज रशीद याला ९०. ४० टक्के गुण तर तृतीय क्रमांकाच्या मुल्ला खालिद अहमद झाहीद हुसेन याला ८७. ४० टक्के गुण मिळाले,अशी माहिती मुख्याध्यापक राज मुजावर यांनी दिली.
‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’चा निकाल १०० टक्के लागला आहे. ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’मध्ये कु.पठाण मुबस्सेरा शमशेर ही विद्यार्थीनी ९४.६० टक्के मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम आली. तर कु. शेख अलीजा इम्तियाज अहमद ही ९३.८० टक्के गुण मिळवून दुसरी आली .कु शेख उम्मेहनी जुबेर ही ९३.६० टक्के गुण मिळवून तिसरी आली,एकूण २० विद्यार्थीनी ९० टक्केपेक्षा गुण घेऊन उत्तीर्ण झाले तसेच १६१ विद्यार्थीनी विशेष योग्यतेसह उत्तीर्ण झाल्या ,अशी माहिती मुख्याध्यापिका सौ.रोशनआरा शेख यांनी दिली.
एम.सी.ई.एस.इंग्लीश मिडीयम स्कुलचा निकाल ९३.९० टक्के लागला. तंबोली झैनब झाहीद व क़ुरेशी मदिहा नईमने ९१. ८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. मेमन राबिया रेहान हिने ८९. ६० टक्के मिळवून दुसरा क्रमांक मिळविला.तंबोली आयेशा शाहनवाजने ८९ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला,अशी माहिती मुख्याध्यापिका असफिया अन्सारी यांनी दिली.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार