पुणे, दि. १३ मे २०२५: महावितरणच्या रास्तापेठ शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. याआधी ते नाशिक मंडलमध्ये याच पदावर कार्यरत होते. रास्तापेठ मंडलचे यापूर्वीचे अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले यांची पदोन्नतीवर मुख्य अभियंतापदी लातूर येथे बदली झा ली. त्यांच्या रिक्त जागी श्री. पडळकर रूजू झाले आहे.
तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ज्ञानदेव पडळकर ऑगस्ट १९९७ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. पदोन्नतीनंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता म्हणून जत, सांगली, कोल्हापूर तर कार्यकारी अभियंता म्हणून पुणे (कोथरूड विभाग) येथे काम केले आहे. जानेवारी २०१७ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे पडळकर यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर सोलापूर व नाशिक येथे काम केल्यानंतर बदलीद्वारे पुणे येथील रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून ते रूजू झाले आहे.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
Pune: डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही, डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार