पुणे, १६/०९/२०२४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागात 4 सप्टेंबर 2024 रोजी एम.ए. हिंदी विषयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, माननीय प्रो. डॉ. पराग काळकर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रो. काळकर म्हणाले, “भाषिक कौशल्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. साहित्यिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाषेचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक भाषा आणि वाङ्मय कौशल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”
प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. टीकम शेखावत यांनी “साहित्यिक, पत्रकारिता आणि भाषिक कौशल्य” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रो. डॉ. ओमप्रकाश शर्मा यांनी “हिंदी भाषेत रोजगाराचे विविध क्षेत्र” या विषयावर विचार मांडले. श्री. दत्त गायकवाड आणि महेश जगताप यांनी “कम्युनिटी रेडिओ तंत्र आणि त्याची उपयोगिता” यावर माहिती दिली.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, डॉ. अभिजीत कुलकर्णी (संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी “शोध प्रक्रिया आणि प्लेग्रिझम” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात हिंदी विभागातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. विभाग प्रमुख प्रो. सदानंद भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे संयोजक डॉ. राजेंद्र घोडे यांनी आभार प्रदर्शन केले.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान