पुणे, 16 सप्टेंबर 2024: जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी ईव्हीएम बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ही मोहीम १० सप्टेंबरपासून राबविण्यात येत असून या मोहिमेंतर्गत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) असलेली व्हॅन जिल्ह्यातील विविध मतदान केंद्र, शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजाराच्या ठिकाणी फिरविण्यात येत असून नागरिकांना या व्हॅनच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन बाबत माहिती देण्यात येत आहे.
या ईव्हीएम व्हॅन मध्ये बहुमाध्यम वैशिष्ट्ये (मल्टीमीडिया फीचर्स) असून मतदान करताना ईव्हीएम चा वापर कसा करावा याबाबत चित्रफीत दाखवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व २१ मतदारसंघांमध्ये या व्हॅन द्वारे ईव्हीएम विषयी जनजागृती करण्यात येत आहे. गावा-गावात ईव्हीएम व्हॅन च्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
नागरिकांच्या मनातील ईव्हीएम संदर्भातील गैरसमज दूर होण्यासाठी या मोहिमेचा लाभ होत आहे. या जनजागृती मोहिमेला गावागावात उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिक ईव्हीएम संदर्भात माहिती जाणून घेत आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मीनल कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान