October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: लाकडी शिडीचा वाद दाम्पत्याच्या जीवावर दोघांना अटक

पुणे, दि. ७/०८/२०२३: घरकाम बांधकामासाठी शेजार्‍याला दिलेल्या लाकडी शिडीचे भाडे न दिल्याची विचारपूस केल्यामुळे दोघांनी दाम्पत्यावर वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी संबंधितांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ४ ऑगस्टला लोणीकंद परिसरातील पाटील वस्तीवर घडली.

विनोद सुनील पाथरे (वय २३) आणि अमर सुनील पाथरे (वय २०, रा. पाटील वस्ती, हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गजानन भीमराव वानखेडे (वय ३५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे आणि पाथरे कुटूंबिय शेजारी राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी वानखेडे दाम्पत्याने पाथरेंना घर बांधकामासाठी आवश्यक लाकडी शिडी भाडेतत्त्वाने दिली होती. त्याचे भाडे आणि शिडी माघारी परत कधी देणार अशी विचारणा गजाननने पाथरे कुटूंबियाकडे केली. त्याचा राग आल्यामुळे दोघा भावडांनी गजाननवर वार करुन गंभीररित्या जखमी केले. भांडणात मध्यस्थी करणार्‍या त्यांच्या पत्नीवरही वार करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. वाय. राजगुरू तपास करीत आहेत.